थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गड किल्ल्याची शाळेय विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी अनेक ठिकाणी या बालचमूसाठी किल्ले बनवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात वाघोली येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार युवा मनावर रुजावेत म्हणून अनिल सातव युवा मंच यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती त्याच्या बक्षीस वितरण समारंभ पार पडला. विविध बक्षिसे व फ्रेम आणि सन्मान चिन्ह देऊन बालचमुंना गौरवण्यात आले आले. यावेळी शिवव्याख्याते शेखर पाटील यांचे शिवव्याख्यान जमलेल्या मुलांच्या ज्ञानात भर टाकणारे ठरले.
सांगरीला हॉटेलमध्ये बक्षीस समारंभ उत्साहात पार पडला. या स्पर्धेत एकूण २५० पेक्षा अधिक स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. व १२५ विविध किल्ले बनविले होते. प्रथम ५ स्पर्धकांना रोख रकमेच्या स्वरूपात व स्वतःच्या किल्ल्याची फोटो फ्रेम आणि सन्मानचिन्ह बक्षीस देण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस रु. ५५०१,द्वितीय क्रमांक रु. ४५०१,तृतीय क्रमांक रु ३५०१,चतुर्थ क्रमांक रु. २५०१,पाचवा क्रमांक रु १५०१, वाटप करण्यात आले.
यावेळी अनिल सातव, संजय सातव, रामकृष्ण सातव, ज्ञानेश्वर कटके, सुनील जाधवराव, बाळासाहेब सातव, संदीप सातव, सागर गोरे, केतन जाधव, मुकेश सातव, संदीप वारे, ऋषी कटके, ओंकार, प्रसाद, जावेद, इतर कार्यकर्ते व पालक व स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते .
