थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)   गेली महिनाभर चालू असलेला काकड आरती सोहळ्याची आज त्रिपुरी पौर्णिमेला सांगता झाली पूर्व हवेलीतील बहुतेक सर्व गावात दररोज पहाटे वेगवेगळ्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमेपासून याला सुरुवात झाली होती यामुळे गावात मंगलमय वातावरण निर्माण झाले अनेक ग्रामस्थ पहाटे मंदिरात गर्दी करत होते.

         वाघोलीत श्रीराम मंदिरात आज काल्याचे कीर्तन झाले तसेच या पौर्णिमेला तुळशी विवाह सोहळा साजरा केला जातो येथेही तुळशी विवाह संपन्न झाला त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी वाघोलीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
         थेऊर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील काकड आरतीची सांगता झाली यामध्ये चिंतामणी प्रासादिक भजनी मंडळ यांनी संपूर्ण महिनाभर ही काकड आरती सोहळा पार पडला यात माऊली कुंजीर, बाबुराव कुंजीर,आनंद तांबे, अविनाश सोनवणे,नरसिंग सुरवसे,आनंद काकडे बाळासाहेब गिरमकर, आलकाबाई कुंजीर, राजेंद्र सोनवणे आदी भाविक यात सहभागी झाले होते.
         कुंजीरवाडी, लोणी काळभोर, नायगाव, उरुळी कांचन इत्यादी गावात आज काल्याच्या किर्तनाने काकड आरतीची सांगता झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *