थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) निसर्गाची अपरिमित हानी झाल्यामुळे निसर्गचक्र धोक्यात आले आहे आपण वेळीच सुधारले नाही तर भविष्य खुप भयंकर आहे त्यामुळे गावागावात पर्यावरण संरक्षण करण्यासाठी तरुणांनी संघटन केले पाहिजे अशी आजची गरज आहे कुंजीरवाडी येथील पर्यावरण संरक्षण समितीचे काम खूपच उल्लेखनीय असून त्यांच्याकडून अनेकविध उपक्रम राबविले जात आहेत वृक्ष लागवड करून ते जगविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे हे करत असताना वन्य प्राणी पक्षी यांचे जतन करणे यावरही त्यांचे विशेष लक्ष आहे.
       झाडांची संख्या कमी झाल्यामुळे पक्षी बेघर होत आहे. त्यामुळे झाडे तोडू नका तर झाडे लावा व लावलेल्या झाडांना जगवा. तरच सर्व पशू पक्षांना हक्काचे घर मिळेल. आज पक्ष्यांची संख्या कमी झाल्यामुळे शेतात कीटक वाढले, कीटक वाढल्यामुळे शेतकरी शेतीतील पिकावर रासायनिक हानिकारक औषधे फवरतात आणि तोच औषध फवारणी केलेला भाजीपाला आपण खातो. औषध फवारणी केलेला भाजीपाला खाल्ल्याने नागरिकांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. जर पक्षी जास्त असते तर त्यांनी शेतातील पिकांवर असणारे सूक्ष्म किटके खाल्ली असती व शेतकरी बांधवांना शेतावर, पिकावर औषध फवरण्याची वेळ नसती आली आणि औषध खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या पैशांची बचत झाली असती. वरील उदाहरण सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की, आपण सर्वांनी पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे. देशी झाडे मोठ्या प्रमाणात लावली पाहिजे जेणेकरून त्यावर अनेक जीव-जंतू, पशु-पक्षी स्वतःचे घरटे बनवून राहू शकतात तसेच त्या झाडाची फळे फुले खाऊन निसर्गाचा समतोल राखू शकतात.
        आज एक सुतार पक्षी नेण्यासाठी थेऊर फाटा येथील राहुल  तुपे यांचा फोन आला की,  प्रकाश तुपे यांच्या घरासमोर एक पक्षी आहे, त्या पक्षाला त्यांनी पाणी व खायला ठेवले आहे. लगेचच पर्यावरण मित्र नंदू बारवकर  व पर्यावरण मित्र हरेश गोठे तिथे पोहोचले आणि पाहिले ते सुतार पक्षाचे पिल्लू होते. हा पक्षी झाडाच्या खोडाला पोखरून डोली करून घरटे करतो व त्यात राहतो. त्याचे मुख्य अन्न झाडाच्या खोडावरील व फांदीवरील किटके असतात. हा पक्षी लांब चोचीने झाडावर आपटून विशिष्ट प्रकारचे आवाज काढतात व संवाद साधतात. सुतार जसा कोरीव काम करतो त्याचप्रमाणे हा पक्षी झाडाला कोरून घरटे बनवतो. सुतार पक्ष्यांमध्ये १८० पेक्षा अधिक प्रकार आहेत, त्यातीलच एक “हुदहूद” प्रजातीचे व अतिशय दुर्मिळ होत चाललेल्या जातीचे पिल्लू होते. नेहमीप्रमाणे त्या पक्षावर उपचार करण्यासाठी डॉ.हुड गोपाल यांच्याकडे नेले व त्यावर प्राथमिक उपचार सुरू केले. त्याला सिरिंजच्या मदतीने थोडेसे पाणी पाजले.सुरुवातीला ते पिल्लू जगेल असे वाटले परंतु ते आपल्या जन्मदात्या आईपासून दूर असल्याने ते जगू शकलं नाही.
             ते वाचविण्यासाठी राहुल तुपे, प्रकाश तुपे सर, भरत निगडे, विशाल वाईकर, नंदकुमार बारवकर  व हरेश गोठे या सर्व पर्यावरण मित्रांचे खूप मोठे प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *