थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) महाराष्ट्रातील महिला व मुलींवरील अत्याचार कमी होताना दिसत नाहीत आज बीडमधील आंबेजोगाई इथे एका अल्पवयीन मुलीवर गेल्या काही महिन्यांपासून तब्बल चारशे जणांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे त्यात काही पोलीसांचाही समावेश असल्याचे कळते.

         मुंबई, पुणे येथील महिला अत्याचाराची घटना ताजी असताना बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे एका अल्पवयीन मुलीवर अनेकांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बीड येथील एका अल्पवयीन मुलीचे वयाच्या तेराव्या वर्षी तिच्यापेक्षा अनेक वर्ष मोठ्या मुलाशी लग्न लावून दिले कारण तिची आई वयाच्या नवव्या वर्षी आईचे निधन झाले होते लग्नानंतर तिच्या नवऱ्याने तिचा शारीरिक व मानसिक छळ केला त्यामुळे ती आपल्या वडिलांकडे आली परंतु तेथे काही जमेना म्हणून ती आंबेजोगाई येथे गेली तेथे पोहोचल्यावर अत्याचाराची मालिका सुरू झाली.
          अत्याचाराची मालिका इतकी भयंकर होती की त्यात काही पोलीस सुद्धा सामील होते तीन वेळा पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले असता ती घेतली नाही या मुलीने आज आंबेजोगाई ग्रामीण पोलिसात तक्रार दिली परंतु महिला व बालविकास विभागात दिलेल्या तक्रारीत भयानक माहिती समोर आली आहे तिच्यावर तब्बल चारशेच्या वर जणांनी अत्याचार केल्याचे कळते.
            यावर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यातील सर्वांना अटक करून कडक कारवाईची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *