थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) सिंधुताई सपकाळ यांच्या 74 वा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी व ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष युवानेते श्री राहुल शेवाळे यांनी सिंधुताई सपकाळ यांची पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण आश्रमात भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने, प्रेमाने आपलसं करणा-या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे.
सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना नुकतेच भारत सरकारचा सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे,त्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांंचा वर्षाव होत आहे.
या प्रसंगी दीपक गायकवाड, गोपाल गायकवाड,दीपक जावळे,नदीम इनामदार,राजेंद्र शेवाळे उपस्थित होते
