शिरूर (हवेलीनामा ऑनलाईन)  वैद्यकीय सेवेसाठी प्रसिद्ध असलेले डॉ.स्वप्नील भालेकर हे शहरातही रुग्णालय उभारू शकले असते.तेथे त्यांना मोठा प्रतिसादही मिळाला असता मात्र त्यांनी ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्यास प्राधान्य दिले.ही बाब निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मत महसुली मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलताना व्यक्त केले.
       व्हिजन केअर सेंटर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या चष्म्याचा नंबर घालविण्यासाठी लॅसिक लेसर सेंटरचे लोकार्पण महसूलमंत्री थोरात यांच्या हस्ते शिरूरला करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
      आमदार अशोक पवार,सुधीर तांबे, सभागृहनेते प्रकाश धारिवाल,अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके,निवृत्त सनदी अधिकारी किशोर राजे निंबाळकर,जिल्हाधिकारी विपीन इटणकर आदी यावेळी उपस्थित होते.चेष्म्याचा नंबर घालविण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना आता  मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज नसुन शिरूर शहरात अत्याधुनिक लॅसिक लेझर सेंटरची सुविधा डॉ.भालेकर यांनी उपलब्ध करून दिली असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे मत शिरूर नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी व्यक्त केले.
      डॉ.स्वप्नील भालेकर म्हणाले की, पुणे-नगरसह अन्य शहरांतील रुग्णालयांपेक्षा सर्वांत स्वस्त लॅसिक उपचार देेण्याबरोबरच गरजू रुग्णांना अल्प दारात ही सेवा पुरवणार असल्याचे डॉ.भालेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *