थेऊर (हवेलीनामा आॕनलाईन) गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत स्तरावर वेगवेगळ्या समित्या स्थापन करून कामाची विभागणी केली जाते व सर्वांच्या सहभागातून विकास साधला जातो.पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी गावच्या पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षपदी माजी उपसरपंच भरत हैशिराम निगडे यांची निवड करण्यात आली तर पाणीपुरवठा समितीच्या उपाध्यक्षपदी दिलीप कुंजीर,आदेश जाधव तर सचिवपदी थेऊरफाटा येथील राहुल धुमाळ यांची निवड करण्यात आली यावेळी कुंजीरवाडीच्या सरपंच अंजू गायकवाड,माजी सरपंच सचिन तुपे,माजी सरपंच संतोष कुंजीर,श्रीनाथ पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन संदीप धुमाळ,उपसरपंच पिंटू तुपे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मेमाणे,गोकुळ ताम्हाणे पुणे जिल्हा शिवसहकार सेनेचे उपाध्यक्ष स्वप्निल कुंजीर कुंजीरवाडीचे ग्रामसेवक गळवे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी निवड झालेल्या नव नियुक्त सर्व पदाधिकार्यांची उपस्थित ग्रामस्थांनी अभिनंदन केले

