सचिन जाधव
शिरूर (हवेलीनामा ऑनलाइन)
शासनात विलीनीकरण करुन घेण्याचा एस.टी.कर्मच्याऱ्यांचा प्रश्र्न मार्गी लागत नाही तोपर्यंत भाजप या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ताकदीनीशी भक्कमपणे उभे राहुन त्यांना आधार देण्याचे काम करणार असल्याचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर बोलताना म्हणाले.
अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना शिरुर बस स्थानकासमोर एस.टी.कर्मच्याऱ्यांचे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शनिवार दि.१३ रोजी विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर आंदोलनस्थळी आले त्यावेळी ते बोलत होते.
बयावेळी माजी मंत्री प्रा.राम शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोद,भाजपचे संपर्कप्रमुख ॲड.धर्मेंद्र खांडरे, खरेदी-विक्री संघाचे आबासाहेब सोनवणे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.विरोधीपक्षनेते दरेकर पुढे बोलताना म्हणाले,एस.टी.कर्मच्यारी काय यातना भोगतात हे त्यांनाच माहीत असुन मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात मुंलाच्या शिक्षणाची फी, घरभाडे यांसह कुटुंबाच्या जीवनावश्यक गरजा देखील भागवणे त्यांना मुश्कील आहे.न्याय हक्कासाठी एस.टी.कर्मच्याऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाकडे लक्ष द्यायला या राज्य सरकारला वेळ नसल्याचा आरोप करुन सर्व श्रेय तुम्हीच
घ्या परंतु एस.टी.कर्मच्याऱ्यांचा विलीनीकरणाचा प्रश्र्न मार्गी लावा.आंदोलनास मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याने आता हे आंदोलन जनतेचे झाले असून आंदोलन कोणी चिरडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला थरा देऊ नका.
कर्मच्याऱ्यांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे विलीनीकरणाचा प्रश्र्न सरकारला मार्गी लावावाच लागेल असा ठाम विश्वास व्यक्त करुन एस.टी.कर्मच्याऱ्यांच्या न्याय्य हक्कांच्या मागण्यासाठी भारतीय जनता पार्टी ताकदीनीशी भक्कमपणे उभी राहुन आधार देण्याचे काम करणार असल्याचे पुढे बोलताना विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले.एस.टी.कर्मच्याऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत तुटपुंज्या पगारात हे कर्मचारी नोकरी करत असून आत्महत्या सारखे पाऊल उचलले असून देखील सरकार दखल घेत नाही. त्यांच्या अडचणी समजून न घेणारे हे लोकशाही विरोधी सरकार असल्याचा आरोप करुन जोपर्यंत एस.टी.कर्मच्याऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या हितासाठी भाजप कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे बोलताना म्हणाले.
