थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)  सोरतापवाडी गावचे  माजी सरपंच सागर चौधरी यांचा वाढदिवस कुंजीरवाडी पर्यावरण समितीच्या वतीने अगळ्यावेगळ्या पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करुन झाडे लावा झाडे जगवा असा नारा देऊन हारित वाढदिवस साजरा करण्यात आला  या निमित्ताने वाढदिवसाचा खर्च टाळून हा वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यावर भर देण्यात आला तसेच लावलेल्या झाडाची देखभाल समिती करणार असल्याचे पर्यावरण समिती कडून सांगण्यात आले गावातील समितीच्या वतीने जिजाऊ उद्यानात रक्त गुंज, कदंब, सोनचाफा, कांचन, भावा, आपटा अशा देशी झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले. माजी सैनिक बंडू  निगडे यांच्या वतीने ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालय या शाळेत पुस्तके भेट देण्यात आली. तसेच माजीवसरपंच सागर चौधरी, खंडू सावंत माजी उपसरपंच भरत निगडे यांच्या वतीने उत्तम वृद्धाश्रम थेऊर व स्वानंद अध्यात्मिक प्रतिष्ठानच्या वतीने हडपसर येथे मोफत व माफक दरात हॉस्पिटल बांधण्याचे काम सुरू आहे त्यासाठी आर्थिक रोख स्वरूपात मदत करण्यात आली. ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालय या शाळेचे नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू आहे त्यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष पै.सचिन  कुंजीर यांच्या वतीने रोख १५ हजार रुपये देण्यात आले.
       यावेळी गावातील पोलीस पाटील, आजी माजी सरपंच-उपसरपंच-सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष-उपाध्यक्ष, विद्यामान ग्रामपंचायत सदस्य, पंचक्रोशीतील अनेक नामांकित नागरिक, पर्यावरण संरक्षण समितीचे सदस्य व अनेक नागरिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *