थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) रायगड जिल्ह्यातील महाड येथे पार पडलेल्या ९ व्या सब ज्युनिअर महाराष्ट्र स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत थेऊर येथिल पोलीस चौकीवर कर्तव्यावर असलेल्या पोलीस जमादार विजय जाधव यांची कन्या सृष्टी जाधव हिने कांस्य पदकाची कमाई केली पदार्पणातच मिळविलेल्या या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पुणे येथील आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे बॉक्सिंग प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या १४ मुलींची या स्पर्धेसाठी निवड झाली होती.राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा असल्याने सर्व विभागातील अनेक स्पर्धक यात सहभागी झाले होते रायगड जिल्ह्यातील महाड येथील नॅशनल मेमोरियल हॉलमध्ये नुकत्याच या स्पर्धा पार पडल्या.यात भूमिका सतपाल खिलारे हिला रौप्य पदक मिळाले तर सृष्टी जाधव हिला कांस्य पदक मिळाले.
या स्पर्धकांना मदन वाणी विजय गुजर राम जगताप कैलास गायकवाड अमोल सोनवणे विशाल गव्हाणे यांनी मार्गदर्शन केले
