सचिन जाधव
शिरूर (हवेलीनामा ऑनलाइन)
         शेतकरी हा केंद्रबिंदु ठेवून संचालक मंडळ चांगले कामकाज करत  असून शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काम कौतुकास्पद असल्याचे शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार म्हणाले.
    यार्डवरील कांद्याची आवक दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असुन शेतकऱ्यांच्या शेतमालाचे ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होणेसाठी आवश्यक असणारे शेड कमी पडत आहे.  मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा कांदा उघड्या जागेवर लिलावासाठी ठेवावा लागत आहे, यामुळे अनेकवेळा कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या बाबींचा विचार करून शेतकऱ्यांचा कांदा उतरविणेसाठी बाजार समितीच्या वतीने लिलावगृहाची (सेलहॉल) उभारणी करण्याचे ठरविले असुन त्याचे शिरूर हवेलीचे आमदार ॲड.अशोक पवार यांचे हस्ते भूमिपूजन माजी आमदार पोपटराव गावडे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
     यावेळी बाजार समितीचे सभापती ॲड.वसंत कोरेकर, उपसभापती प्रविण चोरडीया, माजी सभापती शशिकांत दसगुडे, शंकर जांभळकर, विश्वास ढमढेरे, विकास शिवले, संचालक सतिश कोळपे, विजेंद्र गद्रे, बंडु जाधव, सचिव अनिल ढोकले, सामाजीक कार्यकर्ते उमेश भुजबळ, अमोल बोऱ्हाडे, रंजन झांबरे,आडतदार मच्छिंद्र रोडे, संतोष चोरडीया, राजेंद्र गिते, विजय पळसकर, सागर सुर्यवंशी, अजित गोबारे, योगेश पठारे, विकास जगताप, सुशांत पाचर्णे, जितेंद्र कोळपे, सुभाष वाखारे, दौलत बोऱ्हाडे, रामभाऊ हेलावडे तसेच मोठ्या प्रमाणावर शेतकरी, वाहतुकदार, हमाल, मापाडी व बाजार घटक उपस्थित होते.
       शिरूरसह अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा तसेच दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला कांदा विक्रीसाठी जवळच सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध करून शिरूर कृषि उत्पन्न बाजार समितीने गेल्या चार वर्षापुर्वी नविन मार्केट यार्डवर जाहीर लिलावाने खरेदी विक्रीचे व्यवहार आडतदारांमार्फत सुरू केले आहे.
     बाजार समितीचे मुख्यबाजार शिरूर, उपबाजार तळेगांव ढमढेरे, पिंपळे जगताप व पाबळ येथे सुरू असणाऱ्या मार्केटमुळे शेतकऱ्यांना अगदी जवळ शेतमाल विक्रीची व्यवस्था निर्माण झालेली आहे. पुढील काही दिवसात मुख्यबाजार शिरूर व उपबाजार तळेगांव ढमढेरे येथे भव्य प्रशासकीय इमारत उभारणी करणार असुन उपबाजार वडगांव रासाई येथे शेतमाल विक्री व्यवस्थेसाठी नियोजनबद्ध अश्या मार्केटची उभारणी करणार आहोत. तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलींसाठी शिरूर बाजार समिती वसतीगृहाची उभारणी करणार असलेची माहीती बाजार समितीचे सभापती ॲड.वसंत कोरेकर दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *