पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) सध्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर चालू असलेल्या चिखल फेकीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून आता हे थांबवा आणि आमच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करा जनतेने आपणास वैयक्तिक हेवेदावे कुरापती काढण्यासाठी निवडून दिले नाही तर सार्वजनिक हिताचे निर्णय घ्यावेत अशी तळमळीची विनवणी सर्वसामान्य करतो आहे.अशा सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने निष्फळ असलेल्या चर्चा, आरोप यात रस राहिला नाही यावर अतिशय मार्मिक प्रतिक्रिया हवेलीनामाकडे आहेत.
जेष्ठ पत्रकार जागृती कुलकर्णी यांनी सांगितले की, ही सर्व चॅनेल्स बंद करून पूर्वीप्रमाणे दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या बातम्या प्रमाणे वृत्त दिले जावे चोवीस तास बातम्यामुळे सर्व बचबचपुरी झाली आहे सर्वात अगोदर ब्रेकिंगच्या नावाखाली सर्व मार्गदर्शक तत्वे बाजुला सारली जात आहेत कोणीही उठतं आणि पत्रकार होतात. हातात माईक आणि मीडिया आला म्हणजे पत्रकार होत नाही त्यासाठी रीतसर शिक्षण घ्यायला पाहिजे त्याची आचारसंहिता पाळली पाहिजे ती सध्या पाळली जात नाही.भाषेबद्दल तर काही बोलायला नकोच…कारण अतिशय अशुद्ध भाषा वापरली जाते. भाषेचे व्याकरण तपासले जात नाही. कोणताही शब्द कुठेही वापरायचा….
“वैयक्तिक प्रश्नातून काही सामाजिक प्रश्न आणि सामाजिक जबाबदाऱ्या निर्माण होत आहेत , त्यासाठी वैयक्तिक हित आणि सामाजिक हित हे दोन्ही जपणं निकोप समाज वाढीसाठी आवश्यक आहे , प्रसिद्धीचे वलय आणि झगमगाट असणाऱ्या व्यक्तींचे वैयक्तिक प्रश्न हे त्यांच्या व्यक्तीशी कुटुंबाशी निगडित असतील किंवा एखाद्या सामान्य व्यक्तीचे वैयक्तिक प्रश्न हे त्याच्या बाबतीत जरी वैयक्तिक जरी असले तरी दोघांनाही ते महत्त्वाचे वाटत असतात या मध्ये एवढेच म्हणता येईल वैयक्तिक फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी एखाद्या व्यक्तीने सर्व समाजाला अनावश्यक रित्या सोशल मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व समाज मनास वेठीस धरून वैयक्तिक स्वार्थ पाहणे हे निकोप समाजाचे लक्षण मानता येणार नाही” .
(सौ, सीमा भोसले , गृहिणी व उद्योजिका ,पुणे)
प्राथमिक शिक्षिका असलेल्या व समाजाचे जवळून परीक्षण करणाऱ्या परदेशी मॅडम म्हणाल्या की, समाजकारण आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.सार्वजनिक क्षेत्रात समाजाच्या हिताचे निर्णय घेताना म्हणजेच समाजकारण करताना राजकारण बाजूला ठेवणे अत्यावश्यक आहे, परंतु तसं होत नाही.
दुदैवाने आपल्याकडे सोशल मिडिया सामाजिक प्रश्नांपेक्षा राजकीय विषयांवर चर्चा करण्यात दंग असते.
ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांच्या किंवा तळागाळातल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. त्यावर चर्चा होत नाही. मिडीया आर्यन खानच्या प्रश्नावर मात्र रात्रंदिवस चर्चा करत आहे. खरंच मिडिया आणि राजकीय लोकं समाजासाठी आहेत का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
