पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) हिंजवडी माण मारुंजी गटात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून झालेली विकास कामे जिल्हा परिषदेच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तळागाळातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचविल्या असून राज्यात महाविकास आघाडी सरकारने शेतकरी कामगार असंघटित कामगार यांच्यासाठी विविध शासकीय योजना आणल्या आहेत त्यासाठी घरोघरी जाऊन शासनाच्या योजनाची माहिती शेतकरी तसेच सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविणार असल्याचे हिंजवडी माण जिल्हापरिषद गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष समीर बुचडे यांनी हवेलीनामाशी बोलताना सांगितले.
बुचडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या फंडातून अनेक कामे सुचवली व शासन स्तरावर शेतकऱ्यांसाठी तसेच गोरगरीब जनतेसाठी अनेक योजनाची घोषणा सरकार कडून करण्यात आली असून त्या योजनाची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहवून त्याना त्याचा लाभ मिळवून देणार असल्याचे बुचडे यांनी सांगितले
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम भागातील शहरालगतच्या गावामध्ये विकास साधण्यासाठी सातत्याने काम चालू आहे अनेक कामे पूर्ण झाली आहेत तरीही नागरिकांनी त्यांच्या काही अडचणी असतील तर संपर्क करावा आम्ही त्या संबंधित विभागाकडून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही बुचडे म्हणाले.
