पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) गेल्या काही महिन्यांपूर्वी हवेलीतील तेवीस गावाचे क्षेत्र पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आले त्यामुळे येथील सर्व दस्तऐवज महापालिकेकडे वर्ग केले आहेत परंतु या गावात ग्रामपंचायत कार्यालयात काम करणाऱ्या पात्र व अपात्र कामगारांचे अभिलेख मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडून आजपर्यंत महानगरपालिकेस प्राप्त झाले नसल्याने या कामगारांच्या अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
ग्रामपंचायत कार्यालयात काम करणाऱ्या कामगारांची सविस्तर माहिती मिळणे बाकी आहे जसे आकृतिबंध, सेवा प्रवेश नियम, भरती प्रक्रिया महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम इत्यादी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मिळणे आवश्यक आहे ती मिळण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी नुकतेच एक पत्र जिल्हा परिषदेस दिले आहे.
आज पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त बिनवडे यांची भेट घेऊन समाविष्ट वाघोली गावातील कामगार वर्ग यांच्या वेतन रखडले असून त्या संदर्भात प्रत्यक्ष भेटून चर्चा केली असता त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे यांना पत्र लिहून त्या विषयी अहवालाची मागणी केली आहे परंतु जिल्हा परिषद व महानगरपालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही समस्या निर्माण झाली असून दोन्ही विभागाने समन्वय दाखवून तत्काळ प्रश्न मार्गी लावावा व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा यापुढेही याविषयी जोपर्यंत हा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान वाघोली त्याचा पाठपुरावा चालू ठेवेल असे श्री छत्रपती प्रतिष्ठान वाघोलीचे शिवदास पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
