पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) अल्पावधीतच लोकप्रिय झालेला ‘पिंग पॉंग’ हा ओटीटी प्लॅटफॉर्म मराठी प्रेक्षकांसाठी एक धमाल कॉमेडी शो घेऊन येत आहे.  दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हा खळखळून हवसणारा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या शो चे नाव’पिंग पॉंग’ ‘कॉमेडीचा किंग काँग’ असे आहे. या शो चा प्रदर्शन सोहळा मराठीतील सुपरस्टार अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला. ‘पिंग पॉंग’  या ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्रमुख पुण्यातील युवा उद्योजक जीवन बबन जाधव आहेत, ‘कॉमेडीचा किंग काँग’ या कॉमेडी शो ची निर्मिती सुद्धा त्यांनीच केली आहे.
                 या कॉमेडी शो बद्दल माहिती देताना दिग्दर्शक चेतन चावडा म्हणाले,  ‘पिंग पॉंग’ या फ्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता ‘कॉमेडीचा किंग काँग’ हा धमाल कॉमेडी शो येत आहे.  राज्यभरातील उदयोन्मुख, प्रतिभावंत कलाकारांंना संधी देण्याच्या उद्देशाने ‘ या विनोदी कार्यक्रमाची निर्मिती करण्याची संकल्पना निर्माते, ‘पिंग पॉंग’ ओटीटी प्लॅटफॉर्म चे प्रमुख जीवन जाधव यांनी मांडली,  त्यानुसार या विनोदी कार्यक्रमात राज्याच्या विविध भागातील, शहरातील नवोदित, उदयोन्मुख, प्रतिभावान कलाकार दिसणार आहेत. यामध्ये सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडकर, दीप्ती सोनावणे, आशु वाडेकर, चेतन चावडा, सागर पवार, आदर्श गायकवाड, बाळासाहेब निकाळजे, यश पालनकर, संजय निकम, हेमा ताई, गौरी कुलकर्णी, योगेश सुपेकर, चैताली माजगावकर आदी १६ कलाकार आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांना खळखळून हसण्यासाठीचा हा एक भरगच्च विनोदी खजिना आहे. यामध्ये कॉमेडी स्कीट, स्टँडअप कॉमेडी आदी असणार आहे. प्रेक्षकांना फक्त ‘पिंग पॉंग’ हे अॅप डाऊनलोड करून विनामूल्य ‘कॉमेडीचा किंग काँग’ या कार्यक्रमाचा आनंद  घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *