किरण खुडे
राजगुरुनगर (हवेलीनामा आँँनलाईन)

खेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकुळ घातला असुन कडूस येथे चोरट्यांनी घरफोडी करून साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने व रोख रकमेची चोरी केली आहे. तसेच याच परिसरात चोरट्यांनी चार घरांवर डल्ला मारला आहे. याबाबत सोपान सिताराम पानमंद रा.पानमंदवाडी कडुस (ता.खेड )यांनी खेड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द फिर्याद दिली आहे.
कडुस पानमंदवाडी येथे सोपान पानमंद यांच्या बंद घराचा कडीकोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडुन आत घरात प्रवेश करून घरातील पत्र्याचे पेटीचे कुलूप तोडुन टाकले. व पेटीतील १ लाख पाच हजार रुपयांची सोन्याच्या तारेत ओवलेली व सोन्याचे मोठे मणी असलेली साडेतीन तोळे वजनाची मोहनमाळ, ७० हजार रुपये किंमतीचा दोन तोळे वजनाचा लक्ष्मीहार, ७० हजार रुपयांची व दोन तोळे वजनाची बोरमाळ, ७० हजार रूपयांचे सोन्याच्या पॅन्डलसह सोन्याची साखळी, दोन तोळे वजनाची सोन्याचे तारेत बनविलेली मोत्याची नथ आणि पंधरा हजारांची रोख रक्कम आदी ऐवज चोरट्यानी लांबवला. तसेच पानमंद वस्तीत रहाणारे दत्तु सहादु पानमंद, रामभाऊ गणपत पानमंद, पप्पु मोहन पानमंद याची घरे सुध्दा अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार संतोष घोलप करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *