थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) दिवाळीचा सण म्हटल की गोडधोड व फटाक्याची आतिष बाजी मग यात अबालवृध्दाना हे आकर्षण असते यासाठी बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारची शोभेची व मोठ्या आवाजाची फटाके मांडून अनेक दुकाने गावागावात सजलेली असतात परंतु काही वेळेला एखादा अपघात घडला तर मोठी हानी होऊ शकते याची कल्पना संबंधित प्रशासनास असायला हवी सध्या थेऊर व परिसरात अशीच दुकाने मुख्य बाजारपेठेत थाटलेली दिसून येत आहेत यांच्या कडे कसल्याही प्रकारची सुरक्षा मानके नाहीत त्यामुळे काही अघटित घटना घडली तर यांची जबाबदारी कोण घेणार?

बऱ्याच मोठ्या गावात फटाक्याची दुकाने गावाबाहेर मोकळ्या मैदानात उभारण्याची परवानगी दिली जाते त्यामुळे गावास अपघातापासून कुठल्याही धोका होत नाही परंतु थेऊर पोलिस चौकी अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये हे चिञ पाहावयास मिळत नाही याचे नियोजन दिवाळी पूर्वीच ग्रामपंचायत व पोलिस प्रशासन यांनी एकञितपणे निर्णय घेऊन अशा फटाका दुकानदारास गावाबाहेर मोकळ्या मैदानात जागा उपलब्ध करुन द्यावी व गावातील अशा चौकात दुकाने थाटणाऱ्या दुकानदारास प्रतिबंध करुन संभाव्य धोका टाळावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *