पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) पुणे शहरातील महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनिट – ५ ने जेरबंद करून त्यांच्याकडून लाखोंचे दागिने हस्तगत केले आहेत
गुन्हे शाखेच्या पथकांनी हडपसर, कोंढवा, वानवडी, परिसरामध्ये घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना, गुन्हा घडलेल्या ठिकाणापासून सातत्याने आठवडाभर कोंढवा, हांडेवाडी, हडपसर, मांजरी, लोणी काळभोर, सोरतापवाडी फाटा, उरुळी कांचन, शिंदवणे फाटा, वाघापुर, सासवड, जेजुरी, मोरगाव आणि बारामती असे एकूण १५० कि.मी.अंतरातील जवळपास ५५० सी. सी. टी. व्ही. फुटेज तपासले.तसेच या फुटेजच्या आधारे तांत्रिक विश्लेषण केले.या विश्लेशनाच्या आधारे पोलीस उप निरीक्षक सोमनाथ शेंडगे व युनिट – ५ कडील पथकास प्राप्त झालेल्या बातमीवरून या गुन्ह्यात १) विनोद गोविंद पिंपळे, वय :- २८ वर्षे, रा.मंजुळा अपार्टमेंट, फ्लॅट नं.६ जेल रोड, नाशिक. २) सुरेश भिमा काळे, पस- ३१, रा. सनंगमनेर रोड, नॉर्दन बँक, वॉर्ड नं.७, श्रीरामपूर यांना पकडले. त्यांच्याकडे अधिक तपास करून पुणे शहरातील महिलांच्या गळ्यातील चैन चोरीचे एकूण ०७ गुन्हे उघडकीस आणले आहेत व एकूण १५२ ग्रॅम वजनाचे ०७ मंगळसूत्र व गुन्हा करते वेळी वापरलेले होंडा ऑरनेट स्पोर्ट्स बाईक मोटार सायकल असा एकूण ७,९९,०००/- रू.किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हे गुन्हेगार गुन्हा करण्यासाठी नाशिक व अहमदनगर येथून स्पोर्ट्स बाईक वापरून वेगवान पद्धतीने पुणे शहरात येवून चैन चोरीचे गुन्हे करून लागलीच पळून जात होते.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मा. सहा.पोलीस आयुक्त डॉ.राजेंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त,गुन्हे रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहा.पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस उप निरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, विनोद शिवले, अकबर शेख, पृथ्वीराज पांडोळे, महेश वाघमारे, प्रमोद टिळेकर, विशाल भिलारे, प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, अजय गायकवाड, चेतन चव्हाण, अश्रुबा मोराळे, दत्ता ठोंबरे, अमर उगले, दीपक लांडगे, संजयकुमार दळवी, स्नेहल जाधव, स्वाती गावडे यांनी केलेली आहे.
