जगदीश का. काशिकर,
मुंबई (हवेलीनामा ऑनलाइन) सोलापुरातील सेटलमेंट येथील अंदाजे ७० एकर जागेवर विमुक्त समाजाची गृहनिर्माण सोसायटी निर्माण व्हावी यासाठी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यावर ही जागा विमुक्तांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी ६५ एकर व ५ एकर जागा स्मृतीस्तंभास माणुसकी प्रतिष्ठानला देण्याबाबत मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विमुक्त समाजाच्या प्रमुखांच्या बैठकीत घेतला. याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.
या बैठकीत भटके-विमुक्त जमातीचे नेते भारत माणिक जाधव,शंकर जाधव,पारूबाई काळे, नागनाथ गायकवाड,महेश काळे, कविता चव्हाण यांच्यासह ओबीसी व्हिजेएनटी समन्वय समितीचे अरुण खरमाटे प्रा.सुशीला मोराळे, बापू विभुते प्रकाश राठोड, हसीब नदाफ उपस्थित होते.
या निर्णयामुळे विमुक्त समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून मंत्र्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
