थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) हवेली तालुक्याचे वैभव असलेला यंशवतला सध्या कोणी वालीच उरला नाही कोट्यावधीची स्थावर मालमत्ता असलेल्या या कारखान्याची सुरक्षा केवळ सात ते आठ कंत्राटी सामान्य सुरक्षारक्षकांवर विसंबून पडली आहे यातील धक्कादायक बाब म्हणजे या सुरक्षा रक्षकांना गेली चार ते पाच महिन्यापासून पगारच नाही
यशवंतचा चालू हंगाम असताना सन २०११ मध्ये बंद पडला, चालू स्थितीतील या कारखान्याच्या सभासदांस राज्य सरकारकडून काही मदत होऊन तो चालू होईल अशी भाभडी अशा होती परंतु गेली दहा वर्षे झाली यात दोन सरकार उलटून गेली युती सरकार जाऊन आता आघाडी सरकार आलं तरी अजून शासन दरबारी यशवंत बाबत काहीच हलचाली होत नाहीत सध्या कारखान्याचा ताबा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे आहे व बँकेने यावर एक अवसायक नेमला असून त्यांचेही दुर्लक्ष झाले आहे सध्या तर नवीन अधिकारी नेमले असून त्यांनी पदभार देखील स्वीकारला नसल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे त्यामुळे कारखान्याच्या बाबतीत काही निर्णय घ्यायचा झाल्यास कोण घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या दहा वर्षात कारखान्यात लाखो रुपयाच्या चोऱ्या झाल्या यात कारखान्यात असणारी मशिनरीचे चोरट्यांनी अक्षरशः लचके तोडून कारखाना खिळखिळा केला आहे याला जबाबदार कोण? ऐन दिवाळीत चोरट्यांची माञ चंगळ झाली असून चोरांची दिवाळी गोड होणार एवढ माञ नक्की अशी थेऊर परिसरात चर्चा आहे कारखान्याचा ताबा असलेली एम एस सी बँकेने कारखान्याच्या सुरक्षेसाठी एका खाजगी सुरक्षा एजन्सीला याची जबाबदारी सोपवली होती पंरतू सदर ठेकेदाराने गेली चारपाच माहिन्या पासून येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांना पगार दिलेला नाही कर्मचारी रोज संबंधित ठेकेदाराला फोन करतात पंरतु तो प्रतिसाद देत नाही यामुळे कर्मचारी हवालदिल झाले असून ऐन दिवाळीत या गोरगरीब कर्मचाऱ्यांची दिवाळी माञ अंधारातच जाणार असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे याबाबत एका कर्मचाऱ्यांनी सांगितले की आम्ही बँकेच्या डेक्कन येथील कार्यालयात गेलो असता आम्हाला बँकेकडून सांगण्यात आले की तुमचा पगार आम्ही ठेकेदाराला अदा केला आहे त्यामुळे तुम्ही ठेकेदाराला संपर्क करा चालू महिन्याचा पगार आम्ही तुम्हाला देतो यामुळे तीन माहिन्याचा कर्मचाऱ्यांचा पगार बुडणार असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याचा पविञा घेतला आहे गोरगरीब कर्मचाऱ्यांचे लाखो रुपये लुबाडणार्या ठेकेदारावर बँक कारवाई करणार का तसेच आगामी काळात यशवंतला चोरट्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी काही ठोस उपाय योजना करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे
