थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) गेली सहा महिने संकष्टी चतुर्थीस गणेश भक्त श्री चिंतामणी गणपती दर्शनापासून वंचित राहिले होते त्यांची ही इच्छा आज अश्विन महिन्यातील संकष्टी चतुर्थीला पूर्ण झाली त्यामुळे भाविकांत मोठा उत्साह दिसून आला दिवसभर दर्शनासाठी रांगा लागल्याचे चित्र चिंतामणी मंदिरात पहावयास मिळते.

          कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद करण्यात आले होते पहिली लाट ओसरल्यावर दिवाळीच्या मुहूर्तावर मंदिरे खुली करण्यात आली परंतु मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाचे डोके वर काढले त्यानंतर धार्मिक स्थळे बंद करण्यात आली त्यामुळे गेली सहा महिने देवळं बंद होती आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला संक्रमण दर खूप खाली आल्यावर ही धार्मिक स्थळे पुन्हा खुली केली त्यानंतर ही पहिलीच संकष्टी चतुर्थी असल्याने त्यात रविवार आल्याने सकाळपासून भाविकांची गर्दी होती.
         आज पहाटे पाच वाजता अजय आगलावे यांनी विधिवत पूजा करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले तर चिंचवड देवस्थानच्या वतीने मोरेश्वर पेंडसे यांनी पूजा केली. ऑक्टोबर महिन्यात उन्हाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे मंदिर परिसरात मांडव तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी ही दर्शनबारी मंदिराबाहेर महातारीआई मंदिर रस्त्यावर पोहोचली होती.
           या सर्व परिस्थितीवर लोणी काळभोर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी व त्यांचे सहकारी पोलीस हवालदार विजय जाधव, शिवाजी शिंदे, जगताप यांनी लक्ष ठेवून होते तर देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी भाविकांना सुरळीत दर्शन व्हावे यासाठी चांगली व्यवस्था लावली होती.
         मंदिर उघडण्यापूर्वी प्रशासनाने काही नियम व अटी घालून दिल्या होत्या त्याचे पालन होते किंवा नाही हे पाहण्याची तसदी संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे तसे होताना दिसत नाही कारण आजार होऊ नये याची काळजी अगोदर घ्यावी आजार झाल्यावर त्यावर उपाययोजना करू असे योग्य नाही. जिल्हाधिकारी यांनी या सर्व गोष्टींचा आढावा घेणे अपेक्षित आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *