पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाने दमदार कामगीरी करत स्वतःच्या मुलाचा खुन करुन फरार झालेल्या गुन्हेगारास तीनच तासात अटक केली.
बारामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना पारवडी गावचे पोलीस पाटील यांनी फोनवरून कळवले की, पारवडी गावचे हृददीत शिपकूलेवस्ती येथे कातकरी
समाजातील एका इसमाने स्वतःचे मुलाचा कोयत्याने डोक्यात वार करुन खुन केला आहे ही
बातमी मिळताच ते पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले.तेथे त्याना अशी माहिती मिळाली की, मारुती साधुराम जाधव हा कातकरी समाजाचा माणुस मजुरी साठी पारवडी गावचे हददीत आला असुन त्याने त्याचा सावत्र मुलगा गोपीनाथ मारुती जाधव यांच्यात घरगुती कारणावरुन भांडण झाले होते त्या रागाच्या भरात मारुती जाधव याने आपल्या मुलाच्या डोक्यात व मानेवर लोखडी कोयत्याने वार
करुन खुन करुन पळून गेला आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यासाठी गुन्हेशोध पथकाला सुचना दिल्या.पंरतु त्यास अटक करणे पोलीसासाठी खुप कठीण काम होते .कारण तो इसम अदिवासी समाजाचा असल्यामुळे तो मोबाईल वापर करीत नव्हता तसेच त्याचे कोणी नातेवाईक वगैरे नसल्याने त्याची कोणतीही ओळख ,फोटो उपलब्ध नसल्याने हे जिकीरीचे होते.
गुन्हेशोध पथकाने पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे घटना स्थळापासुनचा वनविभागाचा १० ते १५ कि मी चा टप्पा पायी फिरून वनविभागातील झाडीत लपलेल्या
गुन्हेगारास अवघ्या ३ तासात ताब्यात घेतले पुढील कार्यवाही पोलीस निरीक्षक ढवाण हे करीत आहेत .
ही कामगीरी उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे , पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांचे
मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे,
विनोद लोखंडे,यांनी केली आहे.
