वाघोली (हवेलीनामा ऑनलाइन) येथील वाघेश्वर मंदिरा शेजारी असलेल्या तलावा शेजारी पुणे -अहमदनगर महामार्गावर उपसरपंच महेंद्र भाडळे यांच्याकडून सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले आहे त्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले असून तो अतिशय सुंदर व मनमोहक असल्याने अनेकजन  येथे सेल्फी घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोलीत भव्यदिव्य पाच ठिकाणी मोफत लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व त्याची माहिती घेण्यासाठी वाघोलीत आले असता माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील तसेच उपसरपंच महेंद्र भाडळे यांच्या आग्रहाखातर सेल्फी पॉईंटला भेट देण्यासाठी विनंती केली तेव्हा तो सेल्फी पॉईंट पाहून खासदारांचे ही अगदी मन प्रसन्न झाले व त्यांनी महेंद्र भाडळे यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील व उपसरपंच महेंद्र भाडळे यांच्या सोबत मोबाईल मधील केमेऱ्यात या ठिकाणी सेल्फी घेतला…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *