पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) मंदीराची दान पेटी व शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रीक मोटारी चोरणाऱ्या चोरट्याना भिगवण पोलिसांनी तत्परतेने अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदनवाडी गावचे हद्दीतील सुकंडे वस्ती येथील महादेव मंदीराचे पोर्चमध्ये असलेली लाकडी दानपेडी अंदाजे ८,०००/- रूपये किंमतची कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली होती. तर डाळज नंबर २, गावचे हद्दीत भादलवाडी तलाव येथील शेतीच्या पाण्याच्या इलेक्ट्रीक मोटारींचे मधील तांब्याचे ताराचे वायडींग अंदाजे ४८,०००/- रूपये किंमतीचे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याबाबत भिगवण पोलिस पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला
हे दोन्ही गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे धार्मिक भावनेशी व शेतकरी वर्गाशी निगडीत असल्याने पोलीस अधिक्षक यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सुचना दिल्या होत्या.यावर भिगवण पोलीस स्टेशनमध्ये विशेष पथकाची स्थापना करून ग्रामसुरक्षा दलाचे जवान यांना मदतीस घेवुन चोरट्याचा शोध घेत असतांना पुणे-सोलापुर करून
गस्तीसाठी असतांना डाळज नंबर २, गावचे हृद्दीत पुणे-सोलापुर रोडने एका मोटर सायकलबरून दोन व्यक्ती पोत्यामध्ये काहीतरी घेबुन जाताना दिसले, त्यांना पोलीसांची चाहुल लागताच ते मोटार सायकल सोडुन पळुन जावु लागले त्यावेळी त्यांना पोलीसांनी
ग्रामसुरक्षा दलाचे जवान यांचे मदतीने त्यांना पकडुन ताब्यात घेतले. त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी आम्ही मदनवाडी येथील मंदीरामधील दान पेटी चोरी केली असल्याचे सांगितले.
त्यांचे ताब्यात असलेल्या पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये मदनबाड़ी येथील महादेव
मंदीरामधील चारीस गेलेली दानपेटी मिळून आली.
तसेच त्यांच्याकडे एक पल्सर मोटारसायकल व गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमा असा एकुण १,३८,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अधिक तपास केला असता त्यांनी नातेपुते, फलटण, बारामती या भागात गुन्हे केल्याचे सांगत असुन अधिक तपास चालु आहे. तसेच हे रेकार्डवरील गुन्हेगार असुन त्यांचेवर यापुर्वी बारामती
शहर व बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणी राजेंद्र तुकाराम मोटे, वय २४ वर्षे, रामेखळी, ता.बारामती,जि.पुणे, यास अटक करण्यात आली आहे.तर साथीदार विधीसंघर्ष ग्रस्त बालक यास ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कामगीरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस
अधिकारी, बारामती विभाग गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार, सहा.पोलीस निरीक्षक, विनायक दडस पाटील पोलीस उपनिरीक्षक, पोलीस शिपाई समीर करे, विजय लोडी, अंतुल पठाण, नाना वीर, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, आप्पा
भांडवलकर, होमगार्ड लोंढे, पोलीस पाटील वरणवे, पोलीस मित्र अशोक सोळके, रवी देवकाते व
ग्रामसुरक्षा दल मदनवाडी यांनी केली आहे.
