पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  सर्वसामान्य जनतेच्या अडचणी व तक्रारी यांची शासकीय यंञणेकडून तत्परतेने सोडवणूक व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाहीदिनाकडे पाहिले जाते परंतु गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन झाले नाही परंतु अलीकडे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्याने कोरोना संक्रमण दर घटला परिणामी हवेली तहसील कार्यालयाने उद्या दि. १८ आक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन केल्याचे तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी सांगितले
लोकशाही दिनाला येणाऱ्या प्रत्येक नागरिकांने कोविडचे सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळावेत या लोकशाहीदिनी नागरिकांनी आपले निवदेने तक्रारी विहित नमुन्यात अर्ज दोन प्रतित द्यावेत तसेच न्याय प्रविष्ठ,राजस्व,आपिल,सेवा विषयक,आस्थापना विषयक,बाबी विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक कागद पञ्याच्या प्रति न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत असे हवेलीच्या तहसीलदार कोलते यांनी प्रसिध्दी पञकात म्हणटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *