पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी लागणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून होती यावर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदान हे 5 फेब्रुवारी रोजी पुन्हा असून मतमोजणी 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुका कधी होणार याची सर्वसामान्य बरोबरच इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता लागून होती विशेष म्हणजे कालच सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला 15 फेब्रुवारी पर्यंत निवडणुकीसाठी मदत वाढलेली असताना आज अचानक निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला यामध्ये उमेदवार आपला अर्ज 16 जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान भरू शकतात तर उमेदवारी अर्ज यांची छाननी 22 जानेवारी रोजी होणार आहे. तर मतदान दिनांक 5 फेब्रुवारी रोजी होणार असून मतमोजणी 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे त्यामुळे आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

यामध्ये बारा जिल्हा परिषद व 125 पंचायत समिती यांचा समावेश आहे तसेच उर्वरित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच हाती घेणार असल्याचेही त्यावेळी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *