दिपक खिलारे,
इंदापूर :(हवेलीनामा प्रतिनिधी)
इंदापूर नगरपरिषदेचे नूतन नगराध्यक्ष भरत शहा यांचा ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
इंदापूर शहरातील अंबिकानगर याठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे इंदापूर शहराध्यक्ष ॲड. आनंद केकान मित्रपरिवाराच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शिवसेना शिंदे गटाच्या महिला पुणे जिल्हाध्यक्षा सीमाताई कल्याणकर या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या.
यावेळी ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत सिताप यांनी केले, तर गौतम कडवळे यांनी आभार मानले.
