संजय बोथरा,
चाकण, ( हवेलीनामा प्रतिनिधी) : नुकतेच पुण्यात झालेल्या १५ व्या राष्ट्रीय आणि ८ व्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत युनिक किड्स ने या वर्षीही घवघवीत यश संपादन केले आहे.अशी माहिती संस्थेचे संचालक प्रज्योत बोथरा यांनी दिली.
संस्थेच्या आश्वी पवार हिने अ गटात, तर शौर्य रावडे याने ड गटात मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. भविषा बोथरा आणि पार्थ खसे या विद्यार्थाना प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.तसेच तपस्या कोटेचा, प्रिशा कोटेचा, वृतिका कानोजी, स्वरांश बोथरा, मीरा जाधव, अर्णवी कदम यांना विशेष प्राविण्यसह ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. पूजा बोथरा यांना उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार देण्यात आला. मागील वर्षीही संस्थेच्या विदयार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले होते.
