थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) निवडणुकीच्या मतदानामध्ये महिला मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे गेल्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय नेत्यांकडून या मतदाराला आपलेसे करण्याची संधी घेताना दिसत आहेत सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याने आपले निवडणुकीचे स्थान निश्चित करण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे पूर्व हवेलीतील थेऊर आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटामधील इच्छुक असणाऱ्या सौ पुष्पलता प्रकाश सावंत आणि पंचायत समिती गणामध्ये थेऊर,कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबा यासाठी इच्छुक असलेले योगेश दत्तात्रय काकडे तर कोलवली मांजरी आव्हाळवाडी या गणासाठी इच्छुक असलेल्या पुनम गायकवाड यांच्या माध्यमातून उद्या दि 5 जानेवारी 2026 रोजी आळंदी मातोबा व कुंजीरवाडी या गावातील महिला भगिनींसाठी “हळदीकुंकू” तसेच होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला असून यासाठी भरगच्च बक्षिसांची लय लूट होणार आहे यामध्ये तब्बल चार इलेक्ट्रिक दुचाकी एक फ्रिज दोन वॉशिंग मशीन एक पिठाची गिरणी व दोन एलईडी टेलिव्हिजन सेट असा बक्षीसांचा संच आहे. एवढेच नव्हे तर लकी ड्रॉ च्या माध्यमातून एकूण सहा बक्षीस आहे दिले जाणार आहेत यामध्ये एक इलेक्ट्रिक बाइक मायक्रो ओव्हन दोन मिक्सर व दोन पैठणी आहेत त्यामुळे एकूण 16 बक्षिसे दिले जाणार आहेत विशेष म्हणजे यात एकूण पाच दुचाकी दिल्या जाणार आहेत.

मांजरी येथे प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठान व योगेश नाना काकडे युवा मंच यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी मुख्य पाहुणे म्हणून स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील येसूबाईची भूमिका साकार केलेल्या प्राजक्ता गायकवाड उपस्थित राहणार आहे तर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिने अभिनेता संदेश चौधरी हे करणार आहेत विशेष म्हणजे सहभागी सर्व महिला भगिनींसाठी एक सोन्याच्या दागिना भेटवस्तू म्हणून दिला जाणार आहे त्यामुळे या दोन गावातील महिला मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात सहभागी होतील अशी शक्यता आहे.

हा कार्यक्रम कुंजीरवाडी येथील कुंजीर लॉन्स या ठिकाणी आयोजित केला असून सायंकाळी सहा वाजता तो पार पडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *