पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मॉडेल स्कूल अंतर्गत इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील भोसले वस्ती येथे एक मॉडेल स्कूलची उभारणी करण्यात येत असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी यावेळी सांगितले की जिल्ह्यातील एकूण तीनशे तीन केंद्रातील एक अशाप्रकारे तीनशे तीन शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित केल्या जात आहे यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तसेच इमारत ग्रंथालय कॉम्प्युटर लॅब तसेच शाळेला संरक्षक भिंत उभारणीसाठी लागणारा निधी वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जात आहे पुढील वर्षी प्रत्येक केंद्रातील दोन अशा प्रकारे 606 शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखवला
तसेच या मराठी माध्यमातील शाळांमध्ये विदेशी भाषा शिकविण्याचाही मानस त्यांनी व्यक्त करून दाखवला यामध्ये फ्रेंच जर्मन या भाषा शिकवल्या जातील तसेच नासा इसरो अशा खगोल शास्त्रीय संस्थांच्या संदर्भात माहिती व भेट यावरही विचार चालू असून बारामती व आळंदी या ठिकाणी सायन्स पार्कची उभारणी केली जाणार, यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव तसेच बाल साहित्य संमेलन अशा वेगवेगळ्या संकल्पना राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ह्या मॉडेलचा प्रयोग संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी व त्यांच्या शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी या मॉडेलचा वापर होणार आहे सध्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये इंग्रजी माध्यमाची क्रेझ वाढल्याने मराठी माध्यमातून शाळातून विद्यार्थ्यांची संख्या वाढवत आहे मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्या करणाऱ्या शिक्षकांचे पाल्य देखील इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असल्याचे दिसून येत आहे. यावर या शिक्षकांचे पाल्य देखील मराठी माध्यमांच्या शाळांमधून शिक्षण घेण्यासाठी तयार झाले पाहिजेत.
निमगाव केतकी येथे जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच प्रकल्प संचालक शालिनी कडू तसेच एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर बांधकाम रामसे इंदापूर तालुक्याचे गट विकास अधिकारी सचिन खुडे इंदापूर पंचायत समिती बांधकाम उपाभियंता राऊत हे उपस्थित राहून त्यांनी मॉडेल स्कूल अंतर्गत जिल्हा परिषद भोसले वस्ती शाळा निमगाव केतकी येथील खोल्यांच्या बांधकामाच्या कामाबद्दल माहिती घेतली व काम चांगले व लवकरात लवकर पूर्ण करणे बाबत सर्वांना सूचना करण्यात आल्या त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांना मुलांच्या शिक्षणाबद्दल मुलांना विचारणा करण्यात आली. शाळेच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी निमगाव केतकीचे ग्रामविकास अधिकारी लक्ष्मीकांत जगताप तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

