थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत थेऊर पोलीस चौकी अंतर्गत असलेल्या परिसरात मुळा मुठा नदीत एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत वाहत आलेले असून पोलिसांनी ते ससून रुग्णालयात पाठवले आहे.

त्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही त्याचे वय अंदाजे चाळीस वर्ष, चेहरा गोल नाक बस्के उंची १६८ सेंटीमीटर बांधा मजबूत काळा रंगाच्या टी-शर्ट त्याच्यावर उभ्या पांढऱ्या लाईन पांढऱ्या रंगाची पॅन्ट, राखाडी कलरची जॉकी कंपनीची अंडरवेअर अशा वर्णनाचा हा व्यक्ती आहे.
त्याच्या उजव्या हातावर पोटरी जवळ द. ब. १०/ ६/ २०२१ असे गोंदवले असून डाव्या हातावर ANKITA ROCKS Xll ll XCll लव्ह चिन्ह पुढे ANKI असे गोंदलेले आहे

अशा वर्णनाचा व्यक्ती बद्दल कोणास माहिती असल्यास लोणी काळभोर पोलिसांना संपर्क करावा. पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.
