प्रविण कांबळे,
खामगांव फाटा (हवेलीनामा प्रतिनिधी) पुणे सोलापूर महामार्गांवर मध्यरात्री कासुर्डी फाटा येथे ओव्हरटेकच्या नादात एका ट्रकने होंडा कारला घासून गेल्यामुळे अपघात घडल्यानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली वाहनाच्या मोठया रांगा लागल्या पोलिस घटनास्थळी उशिरापर्यंत पोहोचले नाहीत.
नुकताच खामगांव फाटा येथे अपघात घडला होता त्यानंतर गतिरोधक व दर्शक पट्टे बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली आहे.
पुणे–सोलापूर महामार्गावरील कासुर्डी फाटा येथे अपघाताची घटना घडली. ओव्हरटेक करत असताना ट्रक चालकाने बाजूने जाणाऱ्या होंडा कारला डॅश दिला, त्यामुळे कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे.
या अपघातामुळे पुणे–सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अपघातानंतर बराच वेळ लोटूनही पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते, त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यात अडचणी येत होत्या.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, मात्र वाहनांचे नुकसान झाले आहे. स्थानिक वाहनचालकांकडून वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू होता
