थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) मिळालेल्या राजकीय वारसाच्या बाळकडूच्या जोरावर सिद्धांत सचिन तुपे यांनी पंचायत समिती निवडणुकीत उतरून पुणे सोलापूर महामार्गावरील विकसित होत असलेल्या कुंजीरवाडी ग्रामपंचायत मध्ये सन 1990 पासून आजोबा, वडील आणि आत्या यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपली उमेदवारी भक्कमपणे मतदारांपुढे मांडताना सर्व स्तरातून भरभरून पाठिंबा मिळताना दिसत आहे.

राजकीय वारशासह सामाजिक आणि पारमार्थिक वारसा देखील लाभल्याने मतदारामध्ये उत्सुकता लागलेली आहे.आपल्या प्रचाराची सुरुवात श्री चिंतामणी गणपती येथे नारळ वाढवून करण्यात आली. यावेळी थेऊर सह कुंजीरवाडी गावातील सर्व पदाधिकारी यात सरपंच, उपसरपंच विविध संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक अन्य पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या प्रचारच्या पहिल्या दिवशी थेऊर मधील वार्ड क्र. ३, ४, ५ आणि ६ मधील मतदारांच्या गाठीभेटी घेऊर परिचय पत्रकाचे वाटप केले. यावेळी स्थानिक मतदारांनी सिद्धांत तुपे यांना पाठिंबा देत असल्याचे दिसून आले. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेस आणखी सुरुवात झाली नसली तरीही कोणत्याही दिवशी याची अधिसूचना निघू शकते त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचारासाठी सज्ज झाले आहेत.
सिद्धांत तुपे यांना लाभलेल्या राजकीय वारस्याचा नक्कीच निवडणूक फायदा होताना दिसत असून त्यांना सर्वच स्तरातून चांगला पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
