अतुल देशपांडे,

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य चेअरमनपदी मेसर्स सावकार ट्रॅव्हल्सचे संचालक प्रकाश गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती व्यवस्थापकीय समितीच्या सध्याच्या कार्यकाळासाठी म्हणजेच २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी करण्यात आली आहे. मोटार वाहतूक उद्योगातील दीर्घ अनुभव, कौशल्य आणि रचनात्मक नेतृत्वाच्या आधारे ही जबाबदारी श्री. गवळी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्यावतीने पाठविण्यात आलेल्या नियुक्तीपत्रातराज्यस्तरावरील वाहतूक व्यवसायाशी संबंधित प्रक्ष, शासन व प्रशासनाशी समन्वय, सदस्यसंख्या वाढ, बैठकींचे आयोजन तसेच विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्याची महत्त्वाची जबाबदारी श्री. गवळी यांच्यावर राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे नॅशनल प्रेसिडेंट डॉ. हरीश सबरवाल आणि चेअरमन डॉ. जी. आर. शनमुगअप्पा यांनी श्री. गवळी यांचे अभिनंदन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील वाहतूक क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील वाहतूक व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. श्री. गवळी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *