दिपक खिलारे

इंदापूर : (हवेलीनामा प्रतिनिधी)

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात अल्पसंख्याक हक्क दिनाच्या निमित्ताने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

या  व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते डॉ.डी. डी. बिरादार यांनी अल्पसंख्याक हक्कांची पार्श्वभूमी, त्यांचा ऐतिहासिक संदर्भ तसेच अल्पसंख्याक हक्क दिनाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दुसरे वक्ते जी. बी. मोरे यांनी भारतीय संविधानात अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती देत, त्या तरतुदींचे सामाजिक व कायदेशीर महत्त्व स्पष्ट केले. तसेच डॉ. काझी यांनी अल्पसंख्याक समाजाची सद्यस्थिती व समोर असलेल्या आव्हानांवर आपले विचार मांडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. शिवाजी वीर सर यांनी अल्पसंख्याक हक्क दिनाचे महत्त्व अधोरेखित करत, समता, बंधुता व न्याय या संविधानिक मूल्यांचे संरक्षण करण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन डॉ. महंमद मुलाणी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मनीषा गायकवाड यांनी मानले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. कांबळे अकीन, डॉ. तानाजी कसबे, डॉ. नामदेव पवार, प्रा. रोहन व्यवहारे, प्रा. सद्दाम पटेल, प्रा. प्रकाश करे, प्रा. राधिका घुगे, प्रा. स्वाती राऊत, प्रा. गौरी काणगुडे आदी प्राध्यापक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *