संजय बोथरा

चाकण, ( हवेलीनामा प्रतिनिधी) :

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या ६९ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून चाकण एसटी स्थानक व परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली . खेड तालुका परिट समाजाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बाबाच्या प्रतिमेचे पूजन आगार प्रमुख संदीप गावडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अमोल निकाळे, विजय भोसले आदि उपस्थित होते. चाकण नगर परिषद व नाणेकरवाडी ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने स्वछता मोहीम राबविण्यात आली. दिन दुबळ्या समाजाच्या उद्धरासाठी आयुष्यभर कार्यरत राहणाऱ्या गाडगेबाबा च्या विचारांची शिकवण जीवनाला दिशा देण्या सारखे आहेत . आजच्या पिढीने त्या विचारांचा अभ्यास करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमासाठी परीट समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *