थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पुणे सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाक्यावर लोणीकाळभोर पोलीस ठाणे हद्दीतील नामांकित हॉटेल जयश्री एक्झीक्यूटिव्ह रेस्टॉरंट बार ॲन्ड लॉजिंग वर चक्क वेश्या व्यवसाय चालू असल्याने त्या ठिकाणी लोणी काळभोर पोलिसांनी छापा कारवाई करून या प्रकरणी हॉटेल चे मॅनेजर व एक वेटर अशा दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन दोन पीडित महिलांची सुटका केली.

लोणी काळभोर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. १९/१२/२०२५ रोजी सकाळी १०/०० वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापुर रोडचे कडेला असलेल्या हॉटेल जयश्री एक्झीक्युटिव्ह रेस्टॉरंट बार अॅन्ड लॉजिंग, कवडीपाट टोलनाका, लोणी काळभोर याठिकाणी वैश्या व्यवसाय चालु असल्याची माहीती मिळाल्यावर या माहीतीची खातरजमा करुन छापा कारवाईसाठी ०१ बनावट गि-हाईक तयार करुन पंचासह हॉटेल जयश्री एक्झीक्युटिव्ह रेस्टॉरंट बार अॅन्ड लॉजिग येथे पाठविण्यात आले. बनावट गिऱ्हाईक यांनी हॉटेल मधील मॅनेजर मोहन कसनु राठोड वय-५० वर्ष सध्या रा. श्री साई बिल्डींग, फ्लॅट नं. २०५, पाषाणकर बाग जवळ, लोणीकाळभोर, ता. हवेली, जिल्हा-पुणे यांचेकडे महीलेची सर्व्हिसची मागणी केली त्यावेळी मॅनेजर यांनी बनावट कस्टमर यास पंचासमक्ष होकार दिला व रुम भाडे १५००/- रुपये असल्याचे सांगुन रुम नं. २०१ मध्ये पाठविले. तसेच बनावट कस्टमर यांचेकडुन १०० रुपये घेऊन यातील आरोपी क्र. ०२ गणेश दत्ता चिलकेवार वय-२५ वर्ष, धंदा वेटर, रा. जयश्री लॉज स्टाफ रुम, कवडीपाट टोलनाका, लोणीकाळभोर, ता. हवेली, जिल्हा-पुणे यांचेकरवी कंडोम पाकिट पुरविली. त्यानंतर आरोपी मोहन कसनु राठोड यांनी पिडीत महीला यांना बोलाऊन घेतले. व पिडीत महीला यांना रुम नं. २०१ मध्ये कस्टर असल्याचे सांगुन रुम मध्ये पाठविले. त्या पिडीत महीलांनी मॅनेजर यांच्या सांगण्यावरून रुम नं.२०१ मध्ये जाऊन बनावट गिऱ्हाईक यांची भेट घेतली. व शाररिक संबंध ठेवण्यासाठी ५०००/- रुपये घेत असल्याचे सांगुन त्याचे सोबत शारिरीक संबंध ठेवण्यासाठी तयार झाली. खातरजमा झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे गिऱ्हाईक असलेल्या व्यक्ती ने छापा पथकास माहीती मिळाल्यानंतर तात्काळ छापा टाकला. कारवाईत १) मोहन कसनु राठोड वय ५० वर्ष (मॅनेजर) २) गणेश दत्ता चिलकेवार वय-२५ वर्ष, (वेटर) यांनी स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता ०२ पिडीत महीलांना पैशाचे आमिष दाखवुन त्यांचेकडुन वैश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे निष्पन्न झाले. यात एकुण ८४,४००/- रुपयाचा मुद्देमाल (रोख रक्कम, मोबाईल, कंडोम पाकिट) जप्त करण्यात आले असुन लोणीकाळभोर पोलीस ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ व भा.न्या.स.१४३, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पिडीत महीला यांना रेस्क्यु करुन त्यांची सुटका करण्यात आलेली आहे.

ही कागगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०६, डॉ. सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकाळभोर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, मदतनीस सपोनि बाबर, पोलीस हवालदार चंद्रकांत माने, सागर जगदाळे, महिला पोलीस शिपाई वनिता यादव, सोनावणे, कुंभार, मल्हार ढमढेरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *