थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) मांजरी गावचे माजी उपसरपंच प्रकाश सावंत यांच्या वतीने प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठान आयोजित “स्वस्थ नागरिक सशक्त परिवार” अभियान जिल्हा परिषद गट नंबर ४० मधील थेऊर आव्हाळवाडी गटातील थेऊर, कुंजीरवाडी, कोलवडी साष्टे,आळंदी म्हातोबा,मांजरी आव्हाळवाडी या गावांमध्ये राबविण्यात येणार आहे अशी माहिती प्रकाश सावंत प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली
या अभियानाचा प्रारंभ दि.१९ डिसेंबर रोजी थेऊर येथे होणार असून दोन दिवस हे आरोग्य शिबिर असणार आहे यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन आधिनुक एटीएम च्या साहाय्याने संपूर्ण शरीराची तपासणी करण्यात येणार आहे. दोन दिवस या शिबिरात विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहे ही आरोग्य शिबिरे टप्प्याटप्प्याने प्रत्येक गावात होणार आहेत यामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या पथकामार्फत तपासणी करून मोफत तपासणी तसेच मोफत औषध उपचार करण्यात येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मांजरी गावच्या माजी उपसरपंच सीमाताई प्रकाश सावंत व गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन योगेश काकडे यांनी केले आहे.
या शिबिराबाबत बोलताना प्रकाश सावंत यांनी सांगितले की, सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत यातून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी आरोग्याची योजना आणली असून यामध्ये नागरिकांना मोफत तपासणी करुन औषध उपचार करण्यात येणार आहे आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा माणून यापुढे नागरिकांच्या आरोग्याच्या येणाऱ्या समस्येवर कायमस्वरूपी मदतीचा हात देणार असल्याची माहिती प्रकाश सावंत यांनी दिली.
