पुणे (हवेलीनामा वृतसमूह) उत्तर सोलापूर तहसिल कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार यांनी पदोन्नतीवर असलेल्या सोरेगाव मंडलधिकारी यांना पगारपत्र तयार करून साहेबाना सांगून लवकरात लवकर पगार करून देण्यासाठी ६० हजार रुपयाची लाच मागितली आणि ४० हजार रुपये लाच स्विकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईत रंगेहात सापडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार,चंद्रकांत काशिनाथ हेडगिरे वय 52 वर्ष पद निवासी नायब तहसीलदार उत्तर सोलापूर तहसील कार्यालय, सोलापूर यांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हे उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या हद्दीत मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांची एप्रिल 2025 मध्ये तलाठी ते मंडल अधिकारी अशी पदोन्नती झाल्यावर सोरेगाव मंडळ, उत्तर सोलापूर, येथे मंडलाधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. एप्रिल 2025 पासून त्यांना पगार मिळाला नसल्याने त्यांनी उत्तर सोलापूर चे तहसीलदार यांना विनंती केली परंतु त्यांनी ‘मंडळ अधिकारी यांना पगार कशाला लागतो’ असे बोलून ती बाब गांभीर्यपूर्वक न घेता आपली जबाबदारी टाळून दिली. त्यानंतर तक्रारदार हे तेथील निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांना भेटले असता हेडगिरे यांनी तक्रारदार यांना लवकरात लवकर पगार पत्रक तयार करून साहेबांना सांगून पगार करून देतो त्यासाठी 40,000/- द्यावे लागतील असे सांगून तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी करत करत असल्याबाबत ची तक्रार तक्रारदार यांनी दिनांक 5/12/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे दिली होती.

तक्रारदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे विभागाने दि. 15/12/2025 रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता पडताळणी दरम्यान लोकसेवक निवासी नायब तहसीलदार हेडगिरी यांनी तक्रारदार यांच्याकडे तक्रारदार यांचा 8 महिन्याचा थकीत पगार मिळण्यासाठीची प्रक्रिया राबवून बील पुढे पाठविले आहे असे सांगून 60,000/- रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 40,000/- रूपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.दि.15/12/2025 रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यानी उत्तर सोलापूर तहसील कार्यालय सोलापूर येथे तक्रारदाराकडून 40,000 रुपयाची लाच स्वीकारली असता 18:27 वाजता रंगेहात पकडण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *