किरण खुडे

राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मगाव वाफगाव येथे होळकर किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने किल्ला परिसराचे सुधारणा काम प्रगतीपथावर आहे, ही वास्तू ऐतिहासिक पर्यटन स्थळ होणार असल्याने होळकर किल्ल्याचे नाव जगाच्या पाठीवर झळकणार आहे. असे प्रतिपादन भाजपाचे राज्य सचिव नवनाथ पडळकर यांनी केले.

वाफगाव ( ता.खेड ) येथील होळकर किल्ल्यात महाराजा यशवंतराव होळकर यांचा २५० वा जयंती सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भारतीय डाक विभागाच्या वतीने महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विशेष टपाल पाकीटाचे अनावरण करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर अनावरण प्रायोजक व अहिल्यारत्न फौंडेशनचे अध्यक्ष विक्रांत काळे, भारतीय पोस्ट पुणे विभागाचे सहाय्यक पोस्टमास्तर जनरल ए. जी. पाखरे, सुप्रिटेंडन्ट ऑफ पोस्ट ऑफिसेस पुणे ग्रामीण विभागाचे डी. व्ही. सर्जेराव, समितीचे अध्यक्ष योगेशराजे होळकर, सचिव योगेश काळे उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, होळकर किल्याबरोबर वाफगाव परिसराचा विकास होणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री अजित पवार यांच्या कडे वाढीव निधीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्राचार्य सोमनाथ नजन, अभिमन्यूराजे होळकर, धनंजय तानले, डॉ. शरद गलांडे, मृणाल ढोले पाटील, खंडूतात्या तांबडे, सरदार राजोळे, अँड अविनाश धायगुडे, महेश पिंगळे, रणजित सोलनकर, योगेश धरम, दत्तात्रय गवते, तानाजी लबडे, संग्राम नरुटे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. अहिल्यारत्न फौंडेशन संचलित महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या जयंती सोहळ्यासाठी राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी होळकर किल्ल्यात महाराजांचा जयंती सोहळा संपन्न झाला. यावेळी श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयातील विद्यार्थी व होळकर प्रेमी यांनी महाराजांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रांत काळे यांनी केले. २५० व्या जयंती निमीत्त वर्षभर समितीच्या वतीने विविध कार्यक्रम राबविले जाणार असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले. समिती अध्यक्ष योगेशराजे होळकर यांनी समितीच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन समितीचे उपाध्यक्ष विकास माने यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन समितीचे कार्याध्यक्ष विठ्ठल कडू, सचिव योगेश काळे,सदस्य गजानन ठोंबरे, राजेश होळकर, राहुल सलगर, विठ्ठल सरगर, अनुराग काळे यांनी केले. आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव डोके यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *