थेऊर (हवेलीरामा वृत्तसमूह) पुणे सोलापूर महामार्गावर जिजाऊ मंगल कार्यालयासमोर एक युवक रस्ता ओलांडत असताना भरधाव मोटारीने ठोसरल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये मृत तरुणाच्या वडिलांनी अनोळखी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हडपसर साडे सतरा नळी येथील रहिवासी खंडू भगवान गायकवाड या 34 वर्षीय तरुण जिजाऊ मंगल कार्यालयासमोर रस्ता ओलांडत असताना समोरून बेदरकारपणे आलेल्या मोटारीने जोरदार धडक दिली व त्यास गंभीर जखमी करून प्रसार झाले या जखमीची कसलीही माहिती पोलिसांना न देता तो मोटार चालक निघून गेला या अपघातामध्ये तो मृत्यू पावला आहे या तरुणाचे वडील भगवान गायकवाड यांनी लोणी काळभोर पोलिसांमध्ये अज्ञात वाहन चालका विरुद्ध तक्रार दाखल केली असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत.
