पुणे (हवेलीनामा वृतसमूह) यशवंत सहकारी साखर कारखाना, थेऊर ता. हवेली, जि. पुणे येथे विद्यमान संचालक मंडळ, चेअरमन आणि कार्यकारी संचालक हे कायद्याने व संस्थेच्या घटनेनुसार अपेक्षित कर्तव्ये पार पाडत नाहीत. वारंवार सहकार कायद्याचे उल्लंघन, लेखापरीक्षण अहवालातील दोष दुरुस्ती न सादर करणे, मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार, अनियमितता व बेकायदा कारभार हे सर्व गंभीर स्वरूपाचे वास्तव समोर आले आहे.कारखान्याच्या मालकीच्या जमिनीच्या विक्रीत २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ जमीन विक्रीचा ध्यास घेऊन संस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हा शेतकरी व सभासदांचा विश्वासघात आहे.या अक्षम्य चुका व गैरप्रकारांची सखोल चौकशी व्हावी, यासाठी यशवंत सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने सातत्याने तक्रार अर्ज सादर केले. त्या अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960, कलम 78 अंतर्गत कारवाईची मागणी प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग यांच्याकडे केली होती.यावर प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे यांनी दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी कार्यकारी संचालक यांना सुनावणीसाठी समक्ष उपस्थित राहून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

हा लढा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि यशवंत सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *