पुणे (हवेलीनामा) राज्यात गुटखा बंदी असताना अवैध मार्गाने परराज्यातून गुटख्याची आयात करून गुटखा विक्री सर्वात चालू असताना या अवैध धंद्यावर कारवाई होत नाही हे लक्षात आल्यानंतर इतर राज्यातून आलेल्या व्यक्ती अवैधरित्या बनावट गुटखा निर्मितीकडे वळल्या आणि त्यांनी आपला हा व्यवसाय पुणे सोलापूर महामार्ग शेजारच्या गावांमध्ये पसरवला. या व्यवसायामध्ये परराज्यातून येऊन लोणी काळभोर पोलीस स्टेशन परीसरांमध्ये बनावट गुटखा कारखाना सुरू करून लाखो रुपयांची माया गोळा करून हा व्यवसाय थाटला हे एवढे मोठे धाडस परराज्यातून येऊन एखादी व्यक्ती कशी काय करू शकते हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो नक्की या व्यवसायामध्ये कोणी अदृश्य ‘आका’चा वरदहस्त तर यांच्या डोक्यावर नाहीत ना याची पोलिसांनी सखोल चौकशी करणे आवश्यक आहे कारण राज्यांमध्ये गुटखा व सुगंधी पान मसाला विक्रीवर बंदी असताना देखील अशा प्रकारच्या कारखान्याची निर्मिती होते आणि यातून बनावट गुटखा ही तयार करून परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकला जात होता हे एवढे मोठे काम करताना परराज्यातील व्यक्ती एवढे मोठे धाडस करू शकेल यावर सर्वसामान्यांचा विश्वास बसत नाही.

अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून एक कोटी पेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर या कारखान्याच्या संदर्भात पोलिसांकडून सखोल चौकशी होऊन याच्या मुळापर्यंत जाण्याची आवश्यकता असल्याची चर्चा परिसरांमधील नागरिकांमध्ये होत असल्याचे दिसून येते.

हा बनावट गुटखा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर अशा प्रकारचे बनावट कारखाने परिसरात असण्याच्या शक्यता नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे असे कारखाने परिसरात आहेत का याचा शोध पोलीस खात्यांकडे गुप्तचर यंत्रणा यांचे मार्फत होणे आवश्यक आहे.

अशा प्रकारच्या मानवाच्या आरोग्यांची खेळणाऱ्या व्यवसायांवर अन्न व औषध प्रशासन कसलीही कारवाही करत नसल्याने हा प्रश्न आणखीनच गंभीर होत आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री यांनी संबंधित विभागांना सक्त कारवाईच्या सूचना करणे आवश्यक आहे व नागरिकांच्या आरोग्याची काळजी करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *