थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबा या पंचायत समिती गणातील नागरिकांसाठी इच्छुक उमेदवार योगेश काकडे आणि जिल्हा परिषद थेऊर गटासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवार पुष्पलता प्रकाश सावंत यांच्या वतीने भजन स्पर्धेचे आयोजन कुंजीरवाडी येथील विश्व बँक्वेट हॉलमध्ये करण्यात आले या स्पर्धेसाठी एकूण १९ स्पर्धक मंडळांनी प्रवेश नोंदवला परिसरातील भजनी मंडळांसाठी ही एक पर्वणीच ठरली यापूर्वी हवेली तालुक्यात अशा प्रकारचे भजनी मंडळांसाठी व्यासपीठ उपलब्ध झालेले नव्हते त्यामुळे या गावातील भजनी मंडळींसाठी ही एक सुवर्णसंधी होती आणि हा एक वेगळाच अनुभव होता.

योगेश दत्तात्रेय काकडे यांनी अध्यात्मिक व भक्तीची सांगड घालून तरुण पिढीवर सांस्कृतिक वारसा टिकविण्याची मोठी जबाबदारी उचलल्याचे या भजन स्पर्धेच्या माध्यमातून दिसून आले आपल्या महाराष्ट्राला संतांच्या पार्श्वभूमीचा वारसा असल्याने घरोघरी संत वाङ्मयाचे बाळकडू बालवयापासूनच मिळते त्यामुळे अपसुकच अभंग गवळण या संतांनी निर्माण केलेल्या साहित्याची ओढ लागलेली असते ज्याप्रमाणे संतांनी साहित्य निर्माण केले त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट गायक देखील लाभलेले आहे या संतांच्या अभंगांना सांगेतिक झालर लावून ती रसाळपणे सादर करणे ही एक कला जोपासली जाते.

वारकरी परंपरेत भजनास अनन्यसाधारण महत्त्व आहे यातूनच प्रत्येक गावांमध्ये भजनी मंडळ आपापल्या परीने भगवंताची आळवणी करत असते याच भजनी मंडळांना आपली कला दाखविण्यासाठी एखाद्या व्यासपीठ निर्माण व्हावे याच दृष्टिकोनातून विचार करून योगेश काकडे यांनी भजनांजली हा भजन स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला होता यासाठी प्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर महाराज मेश्राम आणि इंगवले महाराज यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.

या कार्यक्रमाचे सुरुवात थेऊर गावचे माजी सरपंच महादेव दामोदर काकडे, जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार पुष्परता सावंत उद्योजक प्रकाश सावंत माजी सरपंच नवनाथ काकडे, पंचायत समिती इच्छुक उमेदवार योगेश काकडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व विना पूजनाने झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती चंद्रभागा काकडे,दत्तात्रय सखाराम कुंजीर, सुदाम गावडे, उद्योजक सयाजी काकडे, संतोष काकडे सुजित काळे, गणेश गावडे, विनोद काकडे, सुमित कुंजीर, माऊली माथेफोड, अण्णा माथेफोड, संतोष भोंडवे, राहुल काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या भजनी स्पर्धेमध्ये नवदुर्गा महिला भजनी मंडळ गाढवे मळा कुंजीरवाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर विठ्ठल भजनी मंडळ कुंजीरवाडी यांनी दुसरा क्रमांक पटकावला. तर तिसरा क्रमांक संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ वाल्हेकर वस्ती आळंदी म्हातोबा यांनी मिळविला.

या भजनी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भजनी मंडळांना आयोजक योगेश काकडे यांच्यावतीने भजनी साहित्य यामध्ये हार्मोनियम, मृदंग, विना आणि दहा टाळ हे साहित्य देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *