थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर पंचायत समिती गणातील नागरिकांसाठी”भजनांजली” ही भव्य भजन स्पर्धा पुष्पलता प्रकाश सावंत आणि योगेश दत्तात्रय काकडे यांच्या माध्यमातून थेऊर कुंजीरवाडी आणि आळंदी म्हातोबा या गावासाठी आयोजित केली आहे.ही स्पर्धा विश्व बँक्वेट हॉल आळंदी रोड, कुंजीरवाडी येथे गुरुवार दि. २७/११/२०२५ सकाळी ११ वाजता होईल.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रु.११,१११/- सौजन्य : ह.भ.प. बाबासाहेब काकडे तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ७,७७७/- सौजन्य ह.भ.प. नवनाथ महाराज काकडे आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ५,५५५/- सौजन्य: ह.भ.प. आनंद महाराज तांबे यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक भजनी मंडळास भजन साहित्य भेट देण्यात येईल (पेटी, पखवाज, विणा, १० टाळ)
स्पर्धेत सहभागासाठी नियम व अटी : १) प्रत्येक भजनी मंडळात किमान १० सदस्य असावेत
२) सादरीकरणाकरिता प्रत्येकी २० मिनिटे कालावधी असेल.
३) भजनी मंडळाने स्वतःचे भजनाचे साहित्य सोबत आणावे.
४) परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
