नवीदिल्ली (वृतसमूह)  सौदी अरेबिया येथील मक्का येथून मदिना कडे जाणारी बस एका डिझेल टँकरला धडकल्याने लागलेल्या गीत 42 भारतीय जिवंत जाळल्या गेल्याची घटना समोर येत असून यामध्ये 20 महिला व 11 मुलांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

भारतातून लाखो मुस्लिम भाविक मक्का आणि मदिना या सौदी अरेबिया या देशामधील धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी जात असतात अशाच पैकी हैदराबाद येथील मुस्लिम भाविक मक्का मदिना या धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी सौदी अरेबिया मध्ये गेले होते, हे सर्व भाविक उमराह या विधीसाठी समूहाने मक्का व मदिना या ठिकाणी गेले होते. मक्का येथून मदिनाकडे जाणारी भाविकांनी भरलेली बस महामार्गावर एका डिझेल टँकरला जोरदार धडकली यात दोन्ही वाहनांना मोठी आग लागली या आगीमध्ये 42 भारतीय भाविक जळून मृत्युमुखी पडले असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *