पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर यांच्यावतीने सोमवार दि.११ ऑक्टोबर पासून सलग ७५ तास लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे या काळात कोविड प्रतिबंधक पहिला व दुसऱ्या लसीकरनाची व्यवस्था करण्यात आली आहे असे आरोग्य अधिकारी डॉ दगडू जाधव यांनी सांगितले.
कोरोना संक्रमनापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय म्हणून पाहिले जात आहे सध्या १८ वर्षे वयोगटापुढील सर्व नागरिकांचे लसीकरण चालू असून लसीकरणाचा वेग वाढला आहे त्यामुळे संक्रमणाचा दर देखील कमालीचा घटला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली या अमृत महोत्सवी वर्षात अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत हवेली तालुक्यातील लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्र सोमवार दि ११ ऑक्टोबर सकाळी ९ वाजल्यापासून ते दि १४ ऑक्टोबर दुपारी १२ वाजेपर्यंत सलग ७५ तास रात्रंदिवस कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.त्यामुळे परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
