पुणे -(हवेली नामा वृत्तसेवा) Bombay IIT येथील प्रतिष्ठीत प्रोफेसरचे नाव वापरुन शासनाचे आय.आय.टी. मुंबईत AI व Drone प्रकल्प देण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेची २,४६,००,०००/- रुपयांची अर्थिक फसवणुक करणा-या उचशिक्षित सायबर गुन्हेगारास पुणे पोलिसांनी हैद्राबादमधून ताब्यात घेतले.
या गुन्ह्याच्या तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला तसेच मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून आर्थिक फसवणूक करणा-या व्यक्तीचे नाव हे Bombay IIT येथील प्रोफेसरचे नसून ते सितैया किलारु, वय ३४ वर्षे, रा. मेहेर रोड, याप्रल, हैद्राबाद तेलंगणा (Seetaiah Kilaru, Address Meherr Road, yepral, Hydrabad Telangana) असे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी स्वप्नाली शिंदे व सायबर पोलीस पथक हैद्राबाद येथे रवाना झाले. हैद्राबाद येथे साई नगर, प्रगती नगर, निजामपेठ, गच्चीबावली, याप्रल याठिकाणी शोध घेतल्यावर तो याप्रल, हैद्राबाद येथे असल्याची माहिती मिळाली. त्यास सापळा रचून पकडून ताब्यात घेतले. त्याच्याकडील तपासात तो स्वतः गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार Mastermind असल्याचे समजल्यानंतर अटक केली.१० डेबीटकार्ड, १३ पासबुक, १५ चेकबुक, एक ०५ जी सीमकार्ड, सोने खरेदी पावत्या, इतर कागदपत्रे, ७० हजार रुपये किमतीचे ४ मोबाईल, ०१ टॅब, ०१ लॅपटॉप, १,०५,०००/- रूपये रकमेचे पिवळ्या धातुचे दागिने, तसेच ४० लाख रुपये किमतीची एक टोयोटा इनोव्हा कार व ८ लाख रुपये किमतीची एक किया सोनेट कार असा मुद्देमाल (एकूण ४९ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त पुणे शहर, अमितेशकुमार, पोलीस सह आयुक्त पुणे शहर रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पुणे शहर, पंकज देशमुख (गुन्हे) पोलीस उप-आयुक्त आर्थिक व सायबर पुणे शहर विवेक मासाळ पोलीस उप-आयुक्त (पोलीस मुख्यालय) श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहा. पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर पुणे मच्छिंद्र खाडे, यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगिता देवकाते, पोलीस अंमलदार संदिप मुंढे, बाळासोा चव्हाण, नवनाथ कोंडे, संदिप कारकूड, म.पोलीस अंमलदार टिना कांबळे, पोलीस अंमलदार अमोल कदम, सचिन शिंदे, गंगाधर काळे, अदनान शेख, सतिश मांढरे, कृष्णा मारकड, म.पो. अंमलदार सुप्रिया होळकर या पथकाने सदरची कामगिरी केली आहे.
