थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी येथील ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये एकूण ११७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ११६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे विद्यालयाची सिमरन नबीलाल पठाण हिने या परीक्षेत ९०.४0 टक्के गुण घेऊन पहिला क्रमांक पटकावला तर शिवानी विजय पुजारी हिने ८७.८० टक्के गुण घेऊन दुसरा क्रमांक पटकावला अजित किरण हवालदार ८६. ८० गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला विद्यालयाचा निकाल ९९% लागल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा सावंत यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला यामध्ये कुंजीरवाडी येथील ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अरुण घुले तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा सावंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *