पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) आपल्या देशाला उज्वल व दैदिप्यमान अशी परंपरा असून याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे हिंदवी स्वराज्यातील शेवटची लढाई अहमदनगर जिल्ह्यातील खर्ड्या जवळील शिवपट्टण या किल्ल्यावर झाली आणि तेथे मावळ्यांनी विजय मिळवून भगवा ध्वज फडकविला याच किल्ल्याच्या परिसरात सातत्याने प्रेरणा देणाऱ्या देशातील सर्वात उंच(७४ मीटर) स्वराज्य ध्वजाची स्थापना विजया दशमीच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे वजन ९० किलो, आकार ९६×६४ आणि स्तंभाची वजन १९ टन इतके आहे, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या कल्पनेतून या स्वराज्य ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे.
स्वराज्य ध्वज वेगवेगळ्या राज्यातील धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळांना भेटी देऊन सदोतीस दिवसाचा प्रवास करून दि १५ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर स्थापित होणार आहे या ध्वजयाञेचे आगमन तिर्थक्षेञ थेऊर येथे झाले चिंतामणी मंदीर प्रवेश द्वाराजवळ ग्रामस्थ महिलांच्या हस्ते पूजन करण्यात यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलिप वाल्हेकर,महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कोरेगावचे सरपंच विठ्ठल शितोळे, वाडेबोल्हाईचे सरपंच दिपक गावडे,देवस्थानचे विश्वस्त आंनद तांबे, माजी सरपंच राजेश भोरडे,थेऊरचे माजी उपसरपंच विलास कुंजीर, दत्ताञय कुंजीर,शिंदवणेचे माजी सरपंच आण्णासाहेब महाडीक गोविंद तारु,दिलिप उंन्द्रे,बाजीराव भालसिंग,युवराज काकडे, लक्ष्मण चव्हाण,संदीप कुंजीर,प्रितम काळभोर,यशवंत बोराळे,संतोष ओव्हाळ,प्रकाश पायगुडे,सुरेश बोडके,गजानन कुंजीर,पाटीलबुआ कुंजीर, संतोष गावडे, महिला राष्ट्रवादीच्या सरचिटणीस कविता शेडगे,नम्रता कांबळे,संध्या भोर,माया चौधरी तसेच थेऊर ग्रामस्थ उपस्थित होते
